रवींद्र पारिसे हत्याकांडातील पाचवा आरोपी अटकेत

    दिनांक :09-Nov-2025
Total Views |
देवळी,
ravindra-parise-murder-case : तालुक्यातील अंदोरी येथील अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या आणि यवतमाळ जिल्ह्यात येणार्‍या चिंचोली (सावरगाव) येथील बारवर अंदोरी येथील रवींद्र पारिसे यांची धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. याच प्रकरणातील पाचव्या आरोपीस देवळी पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाईसाठी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 

k  
 
योगेश गोटमारे (१९) रा. म्हाडा कॉलनी वार्ड देवळी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. योगेश गोटमारे हा डिगडोह मार्गावरील तुकाराम कामडी यांच्या शेताशेजारी असलेल्या बारला माता मंदिर जवळ असल्याची माहिती देवळी पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या चमूने सदर परिसराला घेराव घालून योगेशला अटक केली. ही कामगिरी नितीन तोडासे, सागर पवार, श्याम गावनेर, मनोज नप्ते, गृहरक्षक राजेंद्र नवथळकर यांनी केली. देवळी पोलिसांनी योगेशला ताब्यात घेऊन कळंब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.