कोट्टायम,
woman-tortured-in-kottayam केरळमधील कोट्टायम येथे एका तरुणीवर काळ्या जादूच्या संशयावरून भयंकर शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका तांत्रिकाने तरुणीच्या शरीरातून भूत-प्रेत काढण्यासाठी तिला दारू आणि बीडी पाजली. हा अमानवीय प्रकार तासन्तास चालला, ज्यामुळे पीडित तरुणीची तब्येत गंभीर बिघडली.

ही बाब तरुणीच्या वडिलांना कळताच त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, या संपूर्ण प्रकारामागे मुलीचा साथीदार आणि त्याचे कुटुंब सामील होते. त्या तरुणाच्या आईला वाटत होते की मुलीवर कोणीतरी काळा जादू केला आहे आणि तिच्या शरीरात त्यांच्या मृत नातेवाइकांच्या आत्मा शिरल्या आहेत. woman-tortured-in-kottayam त्यामुळेच तिने मागील आठवड्यात एक तांत्रिक बोलावून हा विधी करवून घेतला. पीडित तरुणीने माध्यमांना सांगितले की, “त्या दिवशी सकाळी अकरा वाजता विधी सुरू झाला आणि रात्रीपर्यंत चालू होता. हा इतका भीषण होता की मी बेशुद्ध पडले.” तिच्या म्हणण्यानुसार, या दरम्यान तिला दारू आणि बीडी पाजण्यात आली, तसेच शरीरावर जाळण्यासारख्या इतर यातनाही दिल्या गेल्या.
तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करून तांत्रिक शिवदासचा शोध घेतला. तो मोबाईल बंद करून पळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून मुथूर परिसरातून त्याला अटक केली. woman-tortured-in-kottayam त्यानंतर पोलिसांनी युवतीचा साथीदार अखिल (वय 26) आणि त्याच्या वडिलांनाही ताब्यात घेतले. मात्र, आरोपीची आई अद्याप फरार आहे. अटकेतील सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायिक कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस सहआरोपी महिलेला अटक करण्यासाठी शोधमोहीम राबवत आहेत.