हिंगणघाट,
shyam-gawande : राष्ट्रीयस्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे मानकरी प्रा. श्याम गावंडे यांनी शीर्षासन या योगासनाच्या तब्बल १४६ विविधतेचे प्रकार करून ‘ओ माय गॉड’मध्ये हिंगणघाट शहराचे नाव नोंदविले आहे.
समाजात योगाबद्दल जागरूकता पसरवणे हे देखील देशभतीचे एक रूप आहे. सर्वप्रथम शरीर स्वच्छ करा, नंतर घर, या तत्त्वाच्या आधारे त्यांनी हा योग प्रयोग केला. आतापर्यंत सहा रेकॉर्डस त्यांनी केले आहेत. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.