गौण खनिजाची अवैध वाहतूक केल्यास एमपीडीए अंतर्गत कारवाई
दिनांक :10-Dec-2025
Total Views |
अकोला,
minor minerals जिल्ह्यात गौण खनिजाची होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कठोर पाऊल उचलले असून मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर महाराष्ट्र प्रतिबंधात्मक स्थानबद्धता अधिनियम (एमपीडीए) अंतर्गत कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे पत्रक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केले आहे.याशिवाय जिल्हा,उपविभाग व तालुकास्तरीय पथके देखील गठीत केली आहेत.नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी स्वतः काम पाहणार आहेत.
जिल्ह्यात वाळू घाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान अवैध गौण खनिज करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा प्रशासन व खनीकर्म विभागाकडून देखील कारवाईला बगल दिल्या जात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेतीमाफीयांना मोकळे रान असल्याने प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त यांच्याकडे देखील नावासहित तक्रारी पोहोचल्या आहेत. विभागीय आयुक्तांनी देखील नाराजी व्यक्त केली असून कठोर कारवाईची निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सर्व तहसीलदार व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहे.गठीत करण्यात आलेल्या पथकात नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी वर्षा मीना असतील तर जिल्हास्तरीय पथक प्रमुख निखिल खेमनर उपजिल्हाधिकारी, महसूल, विशाल धांडे जिल्हा खनिकर्म अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पि.झेड भोसले तहसीलदार, पोलीस उपनिरीक्षक, अकोला, उपविभागस्तरावर नेमलेल्या पथकामध्ये डॉ शरद जावळे एसडीओ अकोला, मनोज लोणारकर, आकोट, डॉ संतोष येवलीकर, बाळापूर, संदीप अपार एसडीओ मूर्तिजापूर, तालुकास्तरीय पथक प्रमुख डॉ.मिलिंद जगदाळे तहसीलदार, अकोला, डॉ सुनील चव्हाण तहसिलदार आकोट, समाधान सोनवणे तहसीलदार, तेल्हारा, वैभव फरतारे तहसीलदार बाळापूर, डॉ राहुल वानखडे तहसीलदार पातूर, राजेश वझीरे तहसीलदार बार्शीटाकळी, शिल्पा बोबडे तहसीलदार मूर्तिजापूर यांचा पथकप्रमुख म्हणून समावेश आहे.