नागपूर,
love jihad विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार विभाग, पश्चिम जिल्हा, लव्ह जिहाद आणि धर्मांतरांपासून सुरक्षित राहण्यासाठी घराघरांतून जनजागृती अभियान राबवत आहे. या मोहिमेत प्रत्येक घरातील सदस्यांना एकत्र करून त्यांना या विषयावर समुपदेशन केले जात आहे. यात विशेष करून तरुण मुलींना लव्ह जिहादापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे मार्ग समजावून सांगितले जात आहेत. तसेच, धर्मांतर प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या विविध युक्त्या, लोकांना फसवण्याचे प्रकार आणि धर्मांतरानंतरच्या परिस्थितीविषयीही माहिती देण्यात येत आहे.
अभियानात लव्ह जिहादाचे बळी झालेल्या युवतींच्या अनुभवातून जनतेला सचेत केले जात आहे, ज्यामुळे लोकांमध्ये या विषयाविषयी जागरूकता वाढत आहे. love jihad विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार विभागाचे पश्चिम जिल्हा प्रमुख अनंत कपाळे आणि त्यांची टीम संपूर्ण पश्चिम नागपूरात हे अभियान राबवत असून, नागरिकांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
सौजन्य: आशिष नाईक, संपर्क मित्र