भोजाजी भतांमुळे एसटी महामंडळाची एका दिवसाची कमाई अडीच लाखांवर

आगारप्रमुख जयंत शेडमाके यांचे विशेष प्रयत्न

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
आजनसरा,
Bhojaji Maharaj Temple, येथील संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र प्रसाद म्हणून अर्पण करण्यात येणार्‍या पुरण पोळीच्या स्वयंपाकासाठी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असून, रविवार व बुधवारी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या लाखांच्या जवळ असते. त्यामुळे या स्थळी येण्यासाठी भाविक भतांना त्रास होऊ नये म्हणून हिंगणघाट, नागपूर, वर्धा, तळेगाव, काटोल आगाराकडून थेट बससेवा सुरू करण्यात आल्या आहे. याचा महामंडळाला मोठा आर्थिक फायदा होत असून ७ डिसेंबर रोजी एकाच दिवशी एसटी महामंडळाची अडीच लाखांच्या वर कमाई झाली आहे.
 
 

Bhojaji Maharaj Temple 
आजनसरा येथे संत भोजाजी महाराज देवस्थान असून येथे बुधवार आणि रविवारला पुरण पोळीचा स्वयंपाक असतो. ७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची तुफान गर्दी झाली होती. संपूर्ण संतनगरीला यात्रेचे स्वरूप आले असल्याने श्रींच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी या महामंडळाच्या ब्रीद वायाप्रमाणे हिंगणघाट आगार प्रमुख जयंत शेडमाके यांच्या मार्गदर्शनात दिवसभर बसफेर्‍या सुरू असल्याने, भोजाजी भतांना मोठा दिलासा मिळाला. त्यातच महामंडळाची एका दिवसाची कमाई अडीच लाख रुपयांवर गेली असल्याचे सांगण्यात आले. नियोजनासाठी प्रवासीमित्र सामाजिक कार्यकर्ते संजय कोसुरकर, वाहक प्रशांत अरतपहारे यांनी विशेष सहकार्य केले.