चामोर्शी,
Chamorshi, Bhagwat Gyan Yagya week, येथील भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह 4 ते 10 डिसेंबरदरम्यान भाविकांच्या मोठ्या उत्साहात पार पडला. आज बुधवारी 10 डिसेंबर रोजी आयोजित समारोप सोहळ्यात आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त लाडूतुला कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी उसळली.
डॉ. होळी यांच्या Chamorshi, Bhagwat Gyan Yagya week, वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील पदाधिकारी, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉ. होळी यांच्या विविध विकासकामांचा विशेष उल्लेख केला. गडचिरोली येथील वैद्यकीय महाविद्यालय, मार्कंडा परिसरातील विकास प्रकल्पांसह अनेक उपक्रमांमुळे त्यांचे कार्य समाजहितासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवर व भाविकांनी आमदार डॉ. होळी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आशीर्वाद दिले.