तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
deportation-action-against-goon : विविध गुन्हे शिरावर असलेला आरोपी भावेश उर्फ गोलू तिवारी (बोदड रोड चौसाळा) याच्यावर तडीपारची कारवाई करण्यात आली. या आरोपीवर शहर पोलिस ठाणे, लोहारा पोलिस येथे गुन्हे दाखल आहेत.
आरोपी भावेश तिवारीवर विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असतानासुद्धा त्याच्या वर्तणुकीत कोणताही बदल घडून न आल्यामुळे हद्दपारीचा प्रस्ताव सहायक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी यांनी उपविभागीय दंडाधिकाèयांकडे पाठविला. या प्रस्तावावरुन चौकशीअंती गुंड भावेश तिवारी याला एक वर्षापर्यंत यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले.
शहरातील बोदड व वाघापूर परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने तसेच अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रोहित चौधरी, गजानन अजमिरे, रजनी गेडाम, अमोल अन्नेरवार, नकुल रोडे, पवन चिरडे, बबलू पठाण, प्रशांत राठोड, रितेश मस्के यांनी ही कारवाई करुन सराईत गुन्हेगारांवर कायद्याची वचक राहण्यासाठी ही प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली.