तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Federation Cup Kabaddi 2025, अॅम्युचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाची संलग्न असलेल्या, अॅम्युचर कबड्डी फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे 5 व्या फेडरेशन कपचे आयोजन 12 ते 14 डिसेंबरपर्यत करण्यात आले आहे. या फेडरेशन कपसाठी विदर्भाच्या महिला संघाची निवड झालेली असून या विदर्भाच्या संघात पांढरकवडा येथील मित्र क्रीडा मंडळाची खेळाडू समीक्षा वसंत मडावी व दिया वसंत कुमरे यांची निवड करण्यात आली आहे. पांढरकवडासारख्या ग्रामीण व आदिवासीबहुल भागात मित्र क्रीडा मंडळाच्या वतीने गेल्या 65 वर्षांपासून कबड्डी, खोखो व कुस्तीचे राष्ट्रीय खेळाडू अविरतपणे घडविण्यात येत आहे. मित्र क्रीडा मंडळाचे अनेक खेळाडू प्रतिवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन आपल्या शहरासह जिल्ह्याचे, विदर्भाचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल करीत आले आहे.
फेडरेशन कपसाठी निवड करण्यात आलेली समिक्षा व दिया यांनी याआधी अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या आहे. त्यांनी नांदेड येथे झालेल्या विद्यापिठ क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या विद्यापिठाच्या खो खो संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. समीक्षा व दियाने आपल्या निवडीचे श्रेय कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ नागपुरचे अध्यक्ष माजी खा. रामदास तडस, सचिव प्रदीपसिंह ठाकुर, उपाध्यक्ष प्रफुल देशमुख, यवतमाळ जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष हरिहर लिंगरवार, मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मदन जिड्डेवार, उपाध्यक्ष गोपाळराव बिसेटवार, सचिव सुनिल कोपुलवार, विश्वस्त गणपत डोंगरे, अशोक कुमरे यांना दिले आहे.
त्यांना मंडळाचे प्रशिक्षक रवी दर्शनवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निवडीबद्दल राम कुमरे, ओमेश दर्शनवार, राम जिडेवार, संजय औदार्य, अजय कुमरे, अभिजीत जाधव, धिरज रेड्डीवार, आकाश बल्लेवार, पवन मेश्राम, वर्षा तलमले, पायल गाऊने व वरिष्ठ खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.