बाराबंकी,
Five burnt alive in car accident बाराबंकीमध्ये बुधवारी पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर डीह गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. वेगाने धावणाऱ्या ब्रेझा कारने रस्त्याच्या कडेला थांबवलेल्या वॅगन आरला जबर धडक दिल्याने आग लागली. यात गाडीतील पाच लोकांना बाहेत पडणे शक्य झाले नाही. दोन्ही वाहनांमध्ये नऊ जण प्रवास करत होते. यात चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना हैदरगड येथील सीएचसीमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की वॅगन आर एक्सप्रेस-वेच्या कडेला उभी असताना अचानक वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने तीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर काही सेकंदांत दोन्ही कारमध्ये आग पसरली आणि आसपासच्या लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि स्थानिकांनी मिळून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला होता.
बाराबंकीचे पोलिस अधीक्षक अर्पित विजयवर्गीय यांनी सांगितले की, एक कार गाझियाबादची असून दुसरी दिल्लीची आहे. प्राथमिक चौकशीत असे दिसते की पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले पाणी पिण्यासाठी गाडी थांबवली होती, त्याच वेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृतांमध्ये वाराणसीतील जावेद अशरफ यांच्या पत्नी गुलिश्ता (४९), मुलगी समरीन (२२), इल्मा खान (१२), इश्मा खान (६) आणि जियान (१०) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये झीशान (६) यासह इतरांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.