वर्धा,
asha-bothra : आपण प्रत्येक महिलेम÷ध्ये मीरा बघतो. मिरेचे श्रीकृष्णावर प्रेम होते. हकाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणजे मीरा. मीरा म्हणजे क्रांती आणि बदला! तीने हिंसेतून विद्रोह केला नाही म्हणून मीरा परिवर्तनाचे दुसरे नाव असल्याची माहिती जोधपूर (राजस्थान) येथील मीरा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष व गांधीवादी आशा बोथरा यांनी दिली. वर्धेतील जाजू परिवाराच्या वतीने शतायुषी तपोधन श्रीकृष्णदास जाजू स्मृती समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. उल्हास व डॉ. सुहास जाजू यांची उपस्थिती होती.
आशा बोथरा पुढे म्हणाल्या की, राजस्थान सारख्या राज्यात महिलांवर प्रचंड दडपण होते. त्या रूढी परंपरांमध्ये अडकून होत्या. त्यांना फारसे अधिकार नव्हते. अशा परिस्थितीत १९६२ मध्ये राजस्थानमध्ये पंचायत राज सुरू झाले आणि आपली आई छगनबेन गोलछा पहिली महिला सरपंच झाली. त्यानंतर गावातील वा घरघुती भांडणांसाठी वकील वा जात पंचायतकडे न जाण्याचा पहिला निर्णय घेतला. गावांतील निर्णय गावातच ही प्रथा सुरू झाली. त्यानंतर गावात नवर्याने पत्नीला मारल्याच्या घटना झाल्या नाहीत आणि कोणाची सोडचिठ्ठीही झाली नाही. त्या गावातील जीवनशैली पुर्णपणे बदलून गेली असल्याचे त्या म्हणाल्या. १९९९ मध्ये जोधपूर जिल्हा महिला सहायता समितीची बैठक सुरू होती. त्या बैठकीत आपण महिलांना बोलण्याची संधी दिली जात
नसल्याची खंत व्यत केली.
अर्ध्यारात्री एखाद्या महिलेला घरातून काढून टाकले तर तिने ती कोणाकडे जाईल अशा परिस्थितीत आत्महत्येसारख्या घटना घडू शकतात असे मत व्यत केले आणि त्या बैठकीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकार्यांनी ती बैठकच रद्द केली. आपल्याला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि तेथील दोन खोल्यामध्ये महिलांकरिता केंद्र सुरू करण्याची संधी त्यांनी दिली. आपल्या विचारांवर महाभारतातील मिरेचा पगडा असल्याने आपण त्या संस्थेचे नाव मीरा ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य सुरू झाल्यानंतर गावातील महिलांचा पोलिस स्टेशनमध्ये फोन गेल्यास त्या गरजू महिलांना आपल्याकडे पाठवल्या जात होते. त्यामुळे आपल्यावर संसार तोडणारी म्हणून टीकाही होत होती. परंतु, आपण महिलांकरिता काम करण्याचा निर्धार केला होता आणि आजही तेच काम करीत होते. आपले महिलांचे चुप्पी तोड आणि बिंदी लगाओ हे अभियान राजस्थानमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी आम्ही दाम्पत्य आणि सासु सुन सम्मेलनही घेतल्याचे त्या म्हणाल्या. या माध्यमातून महिलांना पुढे आणले. आपण मागासलेल्या गावखेड्यात हरिजनांकरिताही काम केल्याचे त्यांनी सांगितले. महिलेमध्ये मुलगी बघा आणि चांगली सुन होण्यासाठी प्रमाणपत्राची गरज नको असा विचार आपल्या संस्कारातून आपल्या मुलीने व्यत केला. चांगला समाज तयार झाला तर अनेक अडचणींना उत्तर ठरेल असेही आशा बोथरा म्हणाल्या.