घरात गॅस सिलिंडरचा स्फोट... तीन जखमी

एकाची प्रकृती चिंताजनक

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Mumbai gas cylinder blast गोरेगाव पश्चिम परिसरातील शहीद भगतसिंग नगर-२ येथील राजाराम चाळीतील एका घरात आज (बुधवार, १० डिसेंबर २०२५) सकाळी सुमारे ७.४० वाजता गॅस सिलिंडरचा धक्कादायक स्फोट झाला. या स्फोटात एक महिला आणि दोन पुरुष जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

Mumbai gas cylinder blast 
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मालतीदेवी (वय २८), सर्जन अली जावेद शेख (वय ३७) आणि गुल मोहम्मद अमीन शेख हे जखमी झाले आहेत. मालतीदेवीच्या शरीराचा ३०-३५ टक्के भाग भाजला असून, तिची प्रकृती स्थिर आहे. तिचा पुढील उपचार सायन रुग्णालयात सुरू आहे. सर्जन अली जावेद शेखच्या दोन्ही पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृतीही स्थिर आहे. गुल मोहम्मद अमीन शेखच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गणेश रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
 
 
स्फोटानंतर आगही Mumbai gas cylinder blast  लागली, मात्र परिसरातील काही सतर्क रहिवाशांनी तातडीने पाणी ओतून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे जखमींना वेळेवर रुग्णालयात पोहोचवता आले. महापालिका अधिकारी आणि एचबीटी ट्रॉमा केअर हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशांच्या तातडीच्या मदतीमुळे आणखी मोठी हानी टळली.पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून, स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. प्रारंभिक तपासात गॅस सिलिंडरची तांत्रिक चूक किंवा हाताळणीतील चुका संभाव्य कारण म्हणून पाहिली जात आहेत.सध्या स्थानिक रहिवाशांना इमारतीतील सुरक्षिततेसाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच जखमींच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.