फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण:वाहतूक कोंडी वाढली

हॉकर्स झोनकडे विक्रेत्यांची पाठ;स्थानिक आमदाराच्या पाठबळाची चर्चा

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
अकोला,
traffic congestion increases अकोला-शहरातील मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांचे होणारे अतिक्रमण बघता,मनपाने हॉकर्स झोनची निर्मिती केली.मात्र दिवाळी बाजार उठत नाही तोच पुन्हा फेरीवाल्यांनी गांधी मार्गावर अतिक्रमण थाटले आहे.त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.फेरीवाल्यांच्या या प्रकाराला स्थानिक आमदाराचे पाठबळ असल्याची चर्चा बाजारपेठेत आहे.
 
 


फेरीवाला  
 
 
गांधी रोड, टिळक रोड, मोहम्मद अली रोड, न्यू कापड बाजार या मुख्य व्यापारी भागात पुन्हा फेरीवाल्यांची दुकाने रस्त्यांच्या दुतर्फा उभी राहिली आहेत. परिणामी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून, पादचारी आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत.दिवाळीपूर्वी अतिक्रमण हटवल्यानंतर रस्ते मोकळे झाले होते. पण आता परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली आहे. रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. मनपाने मोठ्या खर्चाने ‘हॉकर्स झोन’ विकसित केला.traffic congestion increases फेरीवाल्यांनी काही दिवसांतच तेथून माघार घेतली असून, आजरोजी फक्त दहा ते बारा फेरीवाले उरले आहेत,बाकीचे पुन्हा मुख्य रस्त्यांवर परतले आहेत. महापालिका व पोलिस प्रशासनाकडून पुन्हा अतिक्रमणाच्या प्रश्नावर दुर्लक्ष होत असल्याने आधीचीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याची वस्तुस्थिती आहे.
प्रशासन सुस्त:आयुक्तांच्या भूमीकेकडे लक्ष
मनपा आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त बैठकीत अतिक्रमण हटविण्यासाठी धोरण आखले होते. सुरुवातीला काही दिवस कारवाई झाली, पण नंतर गती मंदावली. अतिक्रमण करणाऱ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न झाल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमण केले.या संदर्भात आयुक्तांच्या भूमीकेकडे लक्ष लागले आहे.
हॉकर्स झोन मध्ये १०- १२ विक्रेते
महापालिका प्रशासनाने आवाहन केल्यानंतर हॉकर्स झोनमध्ये जवळपास शंभर दुकाने लागली होती. महिनाभर व्यावसायिकांनी याठिकाणी आपली दुकाने लावली. मात्र गेल्या आठवड्यापासून सर्रास रस्त्यांवर दुकाने लावली जात आहेत. केवळ दहा ते बारा दुकाने आता याठिकाणी शिल्लक आहेत.