बोराखेडीत अवैध वाळू उपसा जेसीबी व ट्रॅक्टर जप्त

२० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
मोताळा,
illegal sand mining, Borakhedi, अवैधरीत्या वाळूचा उपसा करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत जेसीबी व ट्रॅक्टर जप्त केला आहे. ही कारवाई ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी २० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 

illegal sand mining, Borakhedi, 
बोराखेडी शिवारात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माहितीच्या आधारे पोहेकों अमोल खराडे, पोहेकॉ प्रवीण पडोळ, पोका रवींद्र नरोटे व प्रमोद साळोक यांनी बोराखेडी ग्रामपंचायतीच्या पाठीमागील नदी परिसरात छापा टाकला. छाप्या दरम्यान शे. आसीफ शे. गफार, जेसीबी चालक पवन गोविंदा माळी (रा. रामगाव तांडा) व शे. हसन शे. गफार हे एमएच-२८/डी/९३१७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये, एमएच-२८/बीक्यू/७९३६ क्रमांकाच्या जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करून वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ लाख रुपये किमतीचा जेसीबी, ५ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा एकूण २० लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोहेकॉ प्रवीण पडोळ यांच्याफिर्यादीवरून संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों अमोल खराडे व पोका प्रमोद साळोक करीत आहेत.