नवी दिल्ली,
IndiGo crisis still persists इंडिगोवर संकट अजूनही संपलेले नाही, कारण बुधवारी १० डिसेंबर २०२५ रोजी ३०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअरलाइनने प्रवाशांसाठी एक सल्ला जारी केला आहे की, "घर सोडण्यापूर्वी उड्डाणाची स्थिती तपासा," कारण शेवटच्या क्षणी बदल होऊ शकतात. मंगळवार, ९ डिसेंबर रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी संसदेत परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले, जबाबदारांवर कारवाई होईल आणि बाधित प्रवाशांना परतफेड केली जाईल, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अजूनही नियंत्रणाखाली आलेली नाही.
नवीन नियमांच्या दुसऱ्या टप्प्यामुळे इंडिगोचे कामकाज विस्कळीत झाले असून, आतापर्यंत ४,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत आणि शेकडो उड्डाणे उशिरा सुरू झाली आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि विमान वाहतूक मंत्रालयाच्या देखरेखीखाली इंडिगो परिस्थिती स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा सरकारने विमानांची कामगिरी सामान्य होईपर्यंत उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे पूर्व-बुक केलेल्या प्रवाशांना काही महिन्यांसाठी दररोज शेकडो उड्डाणांमध्ये व्यत्ययाचा सामना करावा लागेल.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सांगितले की, इंडिगोला त्यांच्या उड्डाण वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जे कंपनीचे कामकाज स्थिर करण्यात मदत करतील. मंत्रालयात इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स बोलावण्यात आले असून, त्यांनी प्रभावित उड्डाणांसाठी १०० टक्के परतफेड ६ डिसेंबरपर्यंत पूर्ण झाल्याची पुष्टी केली आहे. यामुळे प्रवाशा ना सुचना दिल्या जात आहेत की, विमानतळावर पोहोचण्यापूर्वी त्यांच्या उड्डाणाची स्थिती पुन्हा तपासावी, कारण अद्यापही अचानक बदल होण्याची शक्यता कायम आहे.