जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी!

असे करणारा बनला पहिला भारतीय गोलंदाज

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
कटक,
Jasprit Bumrah Record : कटकमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर हार मानली. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या आणि एक खास विक्रम प्रस्थापित केला. त्याने टी-२० मध्ये १०० बळी पूर्ण केले. तो भारतासाठी टी-२० मध्ये १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.
 
 
BUMRAH
 
 
 
जसप्रीत बुमराह हा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला
 
जसप्रीत बुमराहने आणखी एक विक्रमही रचला. तो आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. इतर कोणत्याही भारतीयाने ही कामगिरी केलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी लसिथ मलिंगा, टिम साउदी, शकिब अल हसन आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी ही कामगिरी केली.
 
सर्व फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारे गोलंदाज
 
लसिथ मलिंगा (श्रीलंका)
टिम साउदी (न्यूझीलंड)
शकिब अल हसन (बांगलादेश)
शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान)
जसप्रीत बुमराह (भारत)
बुमराने पहिल्या टी२० मध्ये चांगली गोलंदाजी केली
 
जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाले तर, त्याने कसोटीत २३४ आणि एकदिवसीय सामन्यात १४९ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी, जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये १००+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चार खेळाडू होते. आता, बुमराहचे नावही त्या यादीत जोडले गेले आहे. पहिल्या टी२० मध्ये बुमराहच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ३ षटकात १७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. आता तो उर्वरित सामन्यांमध्येही ही कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
 
भारताने मालिकेत आघाडी घेतली
 
पहिल्या टी२० सामन्यात, हार्दिक पंड्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सहा विकेट्स गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १२.३ षटकांत ७४ धावांवर गारद झाला. या मोठ्या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने मागील एकदिवसीय मालिकाही २-१ ने जिंकली.