शेगाव (जि. बुलढाणा),
maharashtra-state-boxing-championship : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा शेगाव संतनगरीतील स्व गजाननदादा पाटील काॅटन मार्केट यार्ड च्या मैदानावर भव्य शुभारंभ झाला. राज्यातील शेकडो खेळाडूंच्या उपस्थितीत, उत्साह, शिस्त आणि अप्रतिम क्रीडावृत्तीच्या वातावरणात स्पर्धेची सुरुवात झाली.
उद्घाटनप्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व मा. जिजाऊ माता आणि संत गजानन महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार होते.
या उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यामध्ये काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, माजी आमदार रेखाताई खेडेकर, बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष संग्राम गावंडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे, माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल, शकुंतला बुच, माजी सभापती दयारामभाऊ वानखडे, प्रदेश सरचिटणीस रामविजय बुरुंगले, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, माजी शहराध्यक्ष किरणबापू देशमुख, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष विजय भालतडक, अधिकारी अरविंद इंगळे, टीएसओ लक्ष्मीकांत यादव,सा बां विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पुंडकर, भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, गटशिक्षणाधिकारी सलीम, माजी नगरसेवक शैलेश पटोकार, वरिष्ठ पत्रकार जयंतराव खेडकर, राजेश अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख रामा पाटील थारकर, शैलेश गोंधणे, तांत्रिक अधिकारी एकनाथ चव्हाण, BFI चे माजी सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजू महाले, विभागीय सचिव विजय गोटे आदींची उपस्थिती होती.
● पहिला सामना प्रेक्षकांची मनं जिंकणारा...
उद्घाटनाचा पहिला सामना रिद्धवी (मुंबई शहर) विरुद्ध मोहन आयान (मुंबई उपनगर) यांच्यात खेळविण्यात आला. जुझारू खेळ करत मोहन आयानने सामन्यात विजय संपादन केला.
या सामन्याचे पंचिंग संचालन आंतरराष्ट्रीय पंच शैलेश ठाकूर (मुंबई) यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत धामंदे, आरती खंडागळे, गायत्री मानकर, शुभम पिंगळे, संकेत सरोदे, तेजस्विनी पाखरे, वैष्णवी सुसर, अभिषेक पाखरे, यश पाटील, संजना उबाळे, राम सुषिर, समृद्धी भोंगे, मोहन चव्हाण, जयश्री शेट्ट्ये,विनोद टिकार यांच्यासह महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
● शताब्दी वर्षात शेगावला मिळाले ‘क्रीडा-गौरव’
या वर्षी बॉक्सिंगचे शताब्दी वर्ष असून, त्या निमित्ताने राजमाता जिजाऊ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन शेगावमध्ये प्रथमच करण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
या भव्य आयोजनाबद्दल जिल्हाध्यक्ष व राज्य कार्याध्यक्ष विठ्ठल लोखंडकर यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटेनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमोर पुनर्विकास प्राधिकरण चे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा ना.प्रवीण दरेकर व आजीवन अध्यक्ष जय कवडी यांचे विशेष आभार मानले.
शेगाव नगरीत चालू असलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा पुढील काही दिवस रंगतदार सामन्यांनी क्रीडाप्रेमींची मनं जिंकणार आहे. महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंकयस्पद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी बाळकृष्ण महानकर यांनी यावेळी सांगितले