रेल्वे गौण खनिज घोटाळ्यात अधिकाऱ्यांना आदेश

विधानसभा उपाध्यक्ष घेणार नागपुरात बैठक

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा

यवतमाळ,
Wardha Yavatmal Nanded railway वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांचा गौण खनीज घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्यात जबाबदार अधिकाèयांचा फास आवळल्या जात असून विधानसभा उपाध्यक्षांनी नागपूर अधिवेशन दरम्यान संबंधित अधिकाèयांची तातडीची बैठक बोलावली आहे. ईटीएस मोजणीचे आदेश दिले असताना अधिकारी टाळाटाळ करीत असल्यामुळे या प्रकरणाची विधानसभा उपाध्यक्षांनी गंभीर दखल घेतली असून जबाबदार अधिकाèयांंविरुद्ध ठोस कारवाई होण्याचे चिन्हे दिसून येत आहे.
 

Wardha Yavatmal Nanded railway  
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. यासोबतच गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात सुरू आहे. या प्रकरणात यवतमाळच्या जिल्हाधिकाèयांना सविस्तर अहवाल एका महिन्यांच्या आत सादर करण्याचे आदेश जुलै महिन्यात देण्यात आले होते, मात्र चार महिने झाले तरी अहवाल सादर झालेला नाही.हे प्रकरण विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी गंभीरतेने घेतले असून सविस्तर माहिती घेण्यासाठी त्यांनी गुरुवार, 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता रवीभवन नागपूर येथे बैठक बोलावली आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी विकास मीना, तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, तहसीलदार योगेश देशमुख, तत्कालीन तहसीलदार कुणाल झाल्टे, तत्कालीन तहसीलदार सुनिल पाटील, जिल्हा खनीकर्म अधिकारी जोशी यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या बैठकीची माहिती तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनाही देण्यात आली आहे. या बैठकीत गौण खनीज घोटाळ्यात ईटीएस मोजणी अद्याप का करण्यात आली नाही? याबाबत खुलासा करावा लागणार आहे. पुर परिस्थिती, निवडणूक यासह विविध कारणे देऊन अधिकाèयांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.आता मात्र विधानसभा उपाध्यक्ष यांच्या आदेशामुळे ईटीएस मोजणी करावीच लागणार असल्याने अनेक कंत्राटदार तसेच अधिकारी या घोटाळ्यात अडकण्याची शक्यता दिसून येत आहे.