नागपूर मंडळात आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Modern sports facilities दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातील क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणाला नवी चालना मिळाली आहे. स्पोर्ट्स असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने मोतीबाग परिसरात नव्याने उभारलेल्या बॅडमिंटन आणि कबड्डी कोर्टचे उद्घाटन+ दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता, मुख्यालय बिलासपूर येथील वरिष्ठ अधिकारी तसेच मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी आणि खेळाडू उपस्थित होते.
 
nagpur
 
ही अत्याधुनिक क्रीडा सुविधा वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आली. त्यांच्या प्रयत्नांमुळे खेळाडू व रेल्वे कर्मचाऱ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि प्रेरक प्रशिक्षण वातावरण उपलब्ध झाले आहे. महाप्रबंधक तरुण प्रकाश यांनी सांगितले की, नव्या सुविधा मंडळात स्पर्धात्मक क्रीडा संस्कृतीला बळ देतील. Modern sports facilities तर मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी म्हटले की, या नव्या कोर्टचा लाभ रेल्वे कर्मचारी, त्यांची मुले आणि परिसरातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.
सौजन्य: प्रवीण डबली, संपर्क मित्र