संग्रामपूर,
nagpur-hind-di-chadar-program : नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर’ या भव्य धार्मिक व राष्ट्रीय एकतेचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाच्या सेवेसाठी संग्रामपूर तालुक्यातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात हजारो भाविकांची उपस्थिती असून, सुव्यवस्था, शिस्त व सेवा व्यवस्थेसाठी बजरंग दल व विहिपचे कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नागपूर येथे झालेल्या हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहेबांच्या शहिदी 350 वर्ष समागम निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवरांचे उपस्थित कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडले असून यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाने सेवेसाठी सहभाग नोंदवला.'हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर' यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते.श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमात राज्यातील शेकडो भाविकांची उपस्थिती होती. यावेळी बुलढाणा जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यासह संग्रामपूर तालुक्यातील सोगोडा व इतर गावातील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी त्याठिकाणी सेवा देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमस्थळी येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शन, वाहन व्यवस्था, पाणी व आरोग्य सेवा, तसेच गर्दी नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. समाजात राष्ट्रभक्ती, धार्मिक एकोपा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात सहभाग घेणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.संग्रामपूर तालुक्यातील युवकांचा या सेवाभावी कार्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग असून, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक एकात्मतेचा संदेश सर्वदूर पोहोचत असल्याचेही यावेळी उपस्थितांनी नमूद केले.