अनिल कांबळे
नागपूर,
illegal hoardings : उपराजधानीत हाेत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांचे फफ्लेक्स, हाेर्डिंग्स आणि बॅनर्ससह कटआऊट शहरभर लावण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाने कठाेर नाराजी व्यक्त केली हाेती. न्यायालयाने महापालिकेला अवैध हाेर्डिंग्स लावणाèया सर्व शुभेच्छुकांच्या नावांची यादी तातडीने सादर करण्याचा आदेश दिला. यादी सादर झाल्यानंतर संबंधित शुभेच्छूक कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्याचाही निर्देश देण्यात आला. नियमांचे उघड उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकीकडून 5 लाख रुपये दंड का वसूल करू नये? तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल का करु नये आणि अवमानना कारवाई का राबवू नये, याबाबतही स्पष्टीकरण मागवण्यात आले. शहरभरात रस्ते आणि चाैकांचे विद्रुपीकरण करणाèयांवर न्यायालयाने थेट कारवाईचे संकेत देत त्यांना माेठा धक्का दिला आहे.

दिनेश नायडू यांनी दाखल केलेली अवमानना याचिका सुनावणीस प्रलंबित आहे. बुधवारी न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमाेर या याचिकेवर सुनावणी झाली. मंगळवारी झालेल्या सुनावणीत वर्धा राेडवरील मेट्राे पिलरवर 60 हून अधिक अवैध हाेर्डिंग्स लावण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली हाेती. त्यावेळी न्यायालयाने याची गंभीर दखल घेत महापालिका व संबंधित अधिकाèयांना कठाेर शब्दांत फटकारून जबाबदार अधिकाèयांना जेलमध्ये पाठविण्याची तयारी दर्शवित, संपूर्ण शहरातील अवैध हाेर्डिंग्स 24 तासांत हटविण्याचा शेवटचा संधीचा आदेश जारी केला हाेता. बुधवारी महापालिका आयुक्तांनी शपथपत्र दाखल करून शहरातील अवैध हाेर्डिंग्स हटवल्याची माहिती न्यायालयाला दिली. न्यायालयाने केवळ यावर समाधान न मानता, शहरभर हाेर्डिंग्स लावणाèया शुभेच्छूकांची संपूर्ण यादी सादर करण्याचा आदेश दिला आणि प्रत्येकावर कारवाई का करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागितले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. तुषार मंडलेकर, महापालिकेच्या वतीने अॅड. जेमिनी कासट आणि राज्य सरकारच्या वतीने अॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.
2800 अवैध हाेर्डिंग्स काढले
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आले की, न्यायालयाच्या आदेशानंतर 24 तासांच्या आत 2803 अवैध हाेर्डिंग्स हटविण्यात आली आहेत. या कारवाईदरम्यान 7 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच या संदर्भात विविध पाेलिस ठाण्यांमध्ये 686 तक्रारी नाेंदविण्यात आल्या आहेत. मंगळवारी, लक्ष्मीनगर आणि धंताेली झाेनमध्ये सर्वाधिक कारवाई झाल्याची माहितीही देण्यात आली.