नागपूर,
Scientific Auditorium स्व. कृष्णा भोयर सरांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त 'न्यू मेलोडीज् ग्रुप' तर्फे दिलीप रपाटे, आबा भोगे, मोहन पांडे आणि डॉ. कविता खोंड यांच्या संयोजनाखाली “सुनहरे नगमें… कृष्णा तेरी याद में…” असा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला स्व. कृष्णा भोयर यांच्या नातेवाईक, सहकारी आणि शिष्य उपस्थित होते. या वेळी मथुरा भोयर, कार्यक्रम प्रायोजक पवन कुकरेजा, प्रख्यात शास्त्रीय गायिका डॉ. कल्याणी देशमुख आणि सुप्रसिद्ध गायिका स्मिता जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात एकूण २७ सुमधुर एकल व द्वंद्व गीते सादर केली गेली. गायक कलाकारांना पवन मानवटकर व चमुने यांनी वाद्यांची साथसंगत केली. Scientific Auditorium निवेदनाची जबाबदारी नयना गाथू यांनी उत्तमरीत्या सांभाळली. पवन कुकरेजा रिअल्टीज, नागपूर यांच्या प्रायोजनाखाली आयोजित हा नि:शुल्क कार्यक्रम मोठ्या प्रमाणात रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. उपस्थितांनी कलाकारांसह आपली स्वरांजली अर्पण केली.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र