धक्कादायक प्रकार... दारिद्रातून तीन बालकांची विक्री?

नाशिकमधील घटना

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
नाशिक,
Nashik child trafficking, नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावजवळील बरड्याची वाडी येथील हंडोगे कुटुंबाच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कुटुंबातील आई बच्चुबाई हंडोगे यांनी आपली १२ अपत्यांपैकी तीन मुलं दत्तक दिल्याचे सांगितले असले तरी, स्थानिक प्रशासन आणि एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुलांच्या संभाव्य अवैध विक्रीचा गंभीर संशय व्यक्त केला आहे.
 

Nashik child trafficking, 
घटनेचा उघड Nashik child trafficking, होण्यामागे आशा सेविकांचा थेट सहभाग आहे. दोन महिन्यांपूर्वी बच्चुबाईने जन्म दिलेल्या बाळाबाबत माहिती घेण्यासाठी जेव्हा आशा सेविका त्यांच्या घरी पोहोचल्या, तेव्हा बाळ घरात नव्हते. आईने कर्मचाऱ्यांसमोर सांगितले की, "आम्ही बाळाला दूध पाजू शकत नाही, म्हणून त्याला दुसऱ्याला दिले." यावरून शंका निर्माण झाल्यानंतर एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सखोल चौकशी केली आणि असा गंभीर संशय व्यक्त केला की बच्चुबाई हंडोगे यांनी यापूर्वीदेखील दोन मुलं अवैध पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीकडे दिली असतील.या घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत, आई-वडील बच्चुबाई हंडोगे आणि त्यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीत आणि प्रशासनाकडून स्थापन झालेल्या समितीच्या अहवालानंतरच सत्य परिस्थिती उघड होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
  
 
बच्चुबाई हंडोगे Nashik child trafficking, यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडताना सांगितले की, "आम्ही मुलांची विक्री केलेली नाही. आमची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, त्यामुळे आम्ही मुलांना आमच्या नातेवाईकांकडे दत्तक दिले." त्यांनी सांगितले की, एकूण १२ अपत्यांपैकी तीन मुलं दत्तक दिली आहेत, तीन मुलींच्या लग्न झाल्या असून पाच मुले त्यांच्या सोबत आहेत.आदिवासी भागातील गरिबी आणि बालकांच्या हक्काचे संभाव्य उल्लंघन या घटनेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिस तपास आणि समितीच्या अहवालानंतरच "विक्री की दत्तक" या प्रकरणाचा नेमका उलगडा होणार आहे.नाशिक जिल्ह्यातील हा प्रकार सामाजिक स्तरावर गंभीर चर्चा निर्माण करत असून, प्रशासनाने तत्काळ योग्य कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.