..अखेर ‘तो’ उपद्रवी वानर जेरबंद

माहूर पुसदच्या रेस्क्यू टीमने टाकळी येथून वानरास केले जेरबंद

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर, 
monkey captured : माहूर तालुक्यातील टाकळी येथे एका उपद्रवी वानरास वन कर्मचाèयांच्या बचाव पथकाने पकडून सुरक्षीत स्थळी सोडले. टाकळी येथे अनेक दिवसांपासून वानराने येथील नागरिकांना हल्ले करून नुकसान करण्यासह इतर प्रकारे उपद्रव माजवून सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे येथील सरपंच आणि ग्रामसेवकांनी निवेदन देऊन या वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी 24 तासाच्या आत उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद आणि माहूरच्या कर्मचाèयांचे बचाव पथक बनवून स्वतःच्या उपस्थितीत उपद्रवी वानरास बुधवार, 10 डिसेंबर रोजी जेरबंद केले.
 
 

y10Dec-Wanar 
 
 
 
नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहायक वनसंरक्षक (किनवट) किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (माहूर) रोहित जाधव यांच्या आदेशांन्वये वानराला पुसद येथील बचाव पथकाच्या मदतीने पशूवैद्यकीय अधिकाèयाच्या निगराणीत पकडण्यात आले. त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.
 
 
यावेळी वनपाल (माहूर) मनोहर कत्तुलवार, वनरक्षक दीपक माने, महेश मांजलवाड, बचाव पथकाचे प्रमुख शे. मुखबीर, वनरक्षक रवी राठोड, किरण सातपुते, मानद वन्यजीव रक्षक पशुसेवक रवी मोरे, वनसेवक कैलास जाधव, परमेश्वर नाईक उपस्थित होते. निवेदनाची दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करून वानरास जेरबंद केल्याप्रकरणी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.