पाकिस्तानी लष्कर प्रवक्त्याने महिला पत्रकाराला मारला डोळ video

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Pakistani army spokesperson video पाकिस्तानच्या लष्करावर पुन्हा एकदा गंभीर आरोपांचा भडिमार सुरू झाला आहे. मीडिया ब्रीफिंगदरम्यान सार्वजनिक मंचावर एका महिला पत्रकाराचा अनादर करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक अहमद शरीफ चौधरी. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी महिला पत्रकार अब्सा कोमान यांना उत्तर देताना केलेली हावभाव विशेषत: डोळा मिचकावण्याची क्रिया आता त्यांच्याच विरोधात संतापाची लाट निर्माण करत आहे.
 
 
Pakistani army spokesperson video
 
मीडिया ब्रीफिंगदरम्यान अब्सा कोमान यांनी तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना हसत महिला पत्रकाराकडे बघत डोळा मिचकवतात ज्यामुळे हा प्रसंग वादाच्या केंद्रस्थानी आला. व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला आहे.