’व्हीव्हीपॅट’ यंत्राचा उपयाेग याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्थानांतरित

- काँग्रेसचे प्रुल्ल गुडधे यांची हाेती याचिका

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
vvpat machine स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी ईव्हीएम मशिनसाेबत ’व्हीव्हीपॅट’ यंत्राचा उपयाेग केला जावा, याकरिता काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रुल्ल गुडधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मंगळवारी मुंबई मुख्यालयात स्थानांतरित करण्यात आली.
 
 

VV pot 
 
 
यावर्षी जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित सर्व याचिका मुंबई मुख्यालयात स्थानांतरित करण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी 5 डिसेंबर राेजी दिले आहेत. त्यामुळे ही याचिका मुंबई मुख्यालयात स्थानांतरित करण्यात आली आहे. या याचिकेवर नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनिल किलाेर व न्या. रजनीश व्यास यांच्यासमक्ष गेल्या 21 नाेव्हेंबर राेजी अंतिम सुनावणी झाली हाेती. त्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यात आला हाेता. आता या याचिकेवर मुंबई मुख्यालयात नव्याने सुनावणी घेतली जाईल.
सर्वाेच्च न्यायालयाने विविध प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्णयानुसार निवडणुकांमध्ये ’व्हीव्हीपॅट’चा उपयाेग करणे बंधनकारक आहे. ’व्हीव्हीपॅट’ पारदर्शी निवडणूक प्रक्रियेचे अत्यावश्यक अंग आहे.vvpat machine असे असतानाही राज्य निवडणूक आयाेग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ’व्हीव्हीपॅट’चा उपयाेग करीत नाही. ’व्हीव्हीपॅट’शिवाय निवडणुका घेतल्यास मतांची चाेरी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या उद्देशाची पायमल्ली हाेईल. संवैधानिक मूल्ये मातीमाेल ठरतील, असे गुडधे यांनी याचिकेत म्हटले आहे.