बिनधास्त स्वभावाची ओळख खूप प्रेरणादायी-संगीतकार पियुष मिश्रा

Ranbir Kapoor acting versatility

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Ranbir Kapoor acting versatility, बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या नव्या प्रयोगांसाठी ओळखला जाणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करत राहतो. ‘बर्फी’ (Barfi) मधल्या खोडकर मूकबधीर भूमिकेपासून ते अलिकडेच आलेल्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal) चित्रपटातील रागीट, वडिलांवर अतिशय प्रेम करणाऱ्या आणि वेळप्रसंगी हिंसक वर्तन करणाऱ्या मुलाच्या भूमिकेपर्यंत, रणबीरने आपल्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा मिळवली आहे.
 

Ranbir Kapoor acting versatility, 
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि संगीतकार पियुष मिश्रा यांनी रणबीरच्या कामाबाबत केलेल्या खुलाश्याने अनेकांना आश्चर्य वाटले, पण त्यात आदरही दिसून येतो. पियुष मिश्राने सांगितले की, रणबीर सेटवर खूप शिस्तप्रिय असतो, पण कॅमेऱ्याबाहेर तो पूर्णपणे बदलतो. पियुष मिश्र म्हणाले, “मी कधीही इतका नग्न आणि निर्लज्ज माणूस पाहिलेला नाही. कॅमेरा नसताना तो मुक्तपणे जगतो. कौटुंबिक वारशाचा, सेलिब्रिटी असण्याचा कोणताही दबाव त्याच्यावर नाही.”पियुषने सांगितले की, रणबीर कपूरनं सिनेसृष्टीतील दिग्गज कुटुंबात जन्म घेतला असला तरी त्यावर त्याचा कोणताही बडेजावपणा दिसत नाही. त्याचा हा साधेपणा आणि स्वातंत्र्य पियुष यांना सर्वात जास्त प्रभावित करतं. “तो माणूस काही वेगळाच आहे. माझ्यासारख्या लोकांसाठी त्याची साधी, निर्लज्ज स्वभावाची ओळख खूप प्रेरणादायी आहे,” असं पियुष मिश्र म्हणाले.याच संभाषणात पियुष मिश्र यांनी दिवंगत अभिनेता इरफान खानचीही आठवण केली. ते म्हणाले की, “आम्ही फार जवळचे मित्र नव्हतो, पण नेहमी एकमेकांच्या कामाचं कौतुक करायचो. आमचं नातं असंच होतं.” इरफान खान यांचे 29 एप्रिल 2020 रोजी कोलन इन्फेक्शनमुळे निधन झाले.
 
 
दरम्यान, रणबीर कपूर लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्यासह अनेक प्रमुख भूमिका आहेत. रणबीरच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतही उत्सुकता भरभरून आहे.