तभा वृत्तसेवा पुसद,
Rutuja Rathod, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने ओरस सिंधुदुर्ग येथे आयोजित राज्यस्तर शालेय कुस्ती स्पर्धेत स्व.अप्पासाहेब अत्रे विजाभज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा फुलवाडी ता. पुसद येथील कुस्तीगीर ऋतुजा रवींद्र राठोड हिने 14 वर्षाखालील 42 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. राज्यस्तर शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन ओरस सिंधुदुर्ग येथे 8 व 9 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेत ॠतुजाने कांस्यपदक पटकावून अमरावती विभागातून राज्यस्तरावरिल आश्रम शाळेची यशाची परंपरा कायम ठेवली. ॠतुजाची मोठी बहीण संचीताने सुद्धा यापूर्वी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक प्रात केले आहे. ॠतुजाने कांस्यपदक प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चव्हाण, सचिव राजेंद्र चव्हाण, जय बजरंग बली व्यायाम शाळा फुलवाडीचे अध्यक्ष विश्वास चव्हाण व मुख्याध्यापक गजानन कलिंदर व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी केले. तिला आश्रम शाळेचे क्रीडा प्रमुख ईशान चव्हाण व आशिष लोंढे यांनी मार्गदर्शन केले.