मुंबई,
Stock market rebounds दोन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने बुधवारी दमदार पुनरागमन केले. सुरुवातीपासूनच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये खरेदी वाढल्याने बाजारात साकारात्मक स्थिती दिसून येत आहे. सकाळच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्सने २४७ अंकांची उसळी घेत ८४,९१० वर मजल मारली. निफ्टीदेखील मजबूत सुरुवात करत ६८ अंकांच्या वाढीसह २५,९०९ च्या जवळ पोहोचला.
निफ्टीमधील आघाडीच्या वाढीदारांमध्ये धातू व वित्तीय क्षेत्रातील शेअर्स वरचढ ठरले. हिंडाल्को, ट्रेंट, टाटा स्टील, जिओ फायनान्शियल आणि मॅक्स हेल्थकेअर यांनी जोरदार तेजी दर्शवत निर्देशांकाला आधार दिला. यामुळे बाजारातील मजबूत क्षेत्रीय ट्रेंड अधिक स्पष्ट झाला. याउलट, काही दिग्गज शेअर्समध्ये कमकुवतपणा कायम राहिला. टायटन, बजाज फायनान्स, एसबीआय लाईफ, टीसीएस आणि सिप्ला हे घसरणीतील प्रमुख शेअर्स ठरले. विशेषतः आयटी आणि लाइफ इन्शुरन्स क्षेत्रात दडपण कायम आहे. एकूणच, गेल्या दोन दिवसांच्या पडझडीनंतर बाजाराने दाखवलेली ही तेजी गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरली आहे.