गडचिरोली,
Suhan Deshpande विद्यार्थांच्या कलागुंनाना वाव देण्यासाठी अधिराज वेलफेअर फाउंडेशन व रोशन चेस अकादमी, गडचिरोलीच्या वतीने आयोजित चेस स्पर्धेत नागपूर येथील सुहान देशपांडे हा विजेता ठरला.या स्पर्धेचे उद्घानपोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपूर्वा पाठक, डॉ. अद्वय अप्पलवार, डॉ. अंकिता अप्पलवार, सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे हे उपस्थित होते.
गडचिरोली डिस्ट्रिक्ट चेस अमुच्युर असोसिएशन यांच्या मान्यतेने रविवारी 7 डिसेंबर रोजी अधिराज बुद्धिबळ चषक एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन गडचिरोली येथील सुमानंद सभागृहात करण्यात आली. या स्पर्धेत विदर्भातील जिल्ह्यातील एकूण 241 प्रद्यावंतानी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत आठ फेर्यांमध्ये चालली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग होता. यामध्ये मुख्य पारितोषिक सुहान देशपांडे, शुभम लाकुडकर, हर्षल भानारकर, पलाश नागदेवते, स्पंदन वाहने, प्रथम गुप्ता, अमोल रामटेके, सिद्धांत टाईडे, अरिहान घागरगुंडे, ओजस भोयर यांनी प्राप्त केला. तर अंडर 15 मध्ये निहान पोहाने, सार्थ भुजाडे, अंडर 13 मध्ये शिवम राठी, अंश कुरुकवर, अंडर 11 मध्ये आदित्य नामपलीवार, हर्ष धुर्वे तर अंडर 9 मध्ये कैवल्य वायकुले, कनिष्क इंदुरकर, अंडर 7 मध्ये शिवांश गुरूनुले, सागर बोधे, अंडर 5 मध्ये मुलगा मानस ठाकरे, हृदय सकिनलावार तर मुलीमध्ये वेदीजा पुंडे, निहारिका झाडे यांनी बक्षिस प्राप्त केला आहे. वयोगट 50 वरील बी. सी. बोरकर, प्रमोद धामगाये तर उत्कृष्ट महिला सविता बट्टुवार, अरुना धुंदले, सर्वोत्कृष्ट गडचिरोली खेळाडू स्वप्नील उराडे, सार्थ वासेकर, विहान सूर्यवंशी, अधिज अप्पलवार, श्रेयस निखाडे तर सर्वोत्कृष्ट चंद्रपूर खेळाडू प्रमोद वानखेडे, उमेश सहारे यांचाही गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरणालाप्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोलीचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हेमंत अप्पलवार व डॉ. वृषाली अप्पलवार, डॉ. अद्वय अप्पलवार हे उपस्थित होते. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण पानतावणे हे उपस्थित होते.