‘त्या’ ५ वाघोच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करा

*वनमंत्र्यांशी आ. कुणावार यांची बैठक

    दिनांक :10-Dec-2025
Total Views |
समुद्रपूर, 
sameer-kunawar : तालुक्यातील गिरड, खुर्सापार परिसरातील एक वाघीण तीन पिल्ले आणि एक वाघ अशा ५ वाघांनी ११ महिन्यापासून परिसरात चांगलीच दहशत निर्माण केले असून आतापर्यंत या वाघांनी अनेक पाळीव जनावरांना ठार केले आहे. या संदर्भात आज १० रोजी वनमंत्री गणेश नाईक, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी वनमंत्री नाईक यांनी वनाधिकार्‍यांना वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सुचना दिल्या.
 

jk 
 
वाघांना जेरबंद करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्याची मागणी आ. कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली होते. सोबतच वनमंत्री गणेश नाईक यांना सुद्धा फोनवर अवगत करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. यावेळी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आ. कुणावार यांनी तालिकाअध्यक्ष पदावरून वनमंत्री गणेश नाईक यांना बिबट्यासह वाघाच्या बंदोबस्तासाठी अधिकार्‍यांच्या बैठका लावून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी आज बैठक घेत वाढत्या मानव—वन्यजीव संघर्षाच्या पृष्ठभूमीवर वाघांचा बंदोबस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी बैठकीतून केली गेली. वन्यजीव सुरक्षा आणि ग्रामस्थांची सुरक्षितता दोन्हीही लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलण्याबाबत वनमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.
 
 
तसेच बैठकीत वन विभाग, वर्धा यांच्या हद्दीतील मौजा कानकाटी तसेच इतर मंजूर तीर्थक्षेत्र विकासकामांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून शासनाने मंजूर केलेला निधी परत जाणार नाही व स्थानिक भाविकांच्या सोयीसाठी आणि पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक असलेली कामे पार पडतील. याशिवाय, हिंगणघाट व समुद्रपूर तालुयांतील वन विभागाच्या हद्दीत येणार्‍या विविध योजनांमधील मंजूर विकासकामे पूर्ण करण्यासाठी ३/२ च्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात यावी, या विषयावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत अपर मुख्य सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, प्रधान मुख्य वन संरक्षक, वनसंरक्षक, उप वनसंरक्षक वर्धा आदी उपस्थित होते.