तभा वृत्तसेवा
पाटणबोरी,
ajastra-shivling-sent-to-bihar : तामिळनाडूच्या महाबलीपुरम येथून बिहारमधील चंपारण्य येथे 210 टनाचे शिवलिंग नेण्यात येत आहे. महाबलीपुरम ते चंपारण्य 2 हजार 250 किमी अंतर असून मार्गात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. छपरा चंपारण्यमधील कथवालिया गावात राम मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या प्रवासात ठिकठिकाणी शिवलिंगाचे पूजन करण्यात येत आहे.
21 नोव्हेंबरपासून शिवलिंगाचा प्रवास सुरू झाला असून हैदराबाद, नागपूर, जबलपूर, सतना, मिर्झापूर मार्गाने हे शिवलिंग कथवालिया येथे जाणार आहे. शिवलिंग असलेला ट्रक दररोज सरासरी 60 किमी अंतर पार करतो. या ट्रकला 96 टायर असून अनेकदा प्रवासात अडचणींना सामोरे जावे लागते.
सुरक्षा देखरेखी करिता 14 जणांची चमू ट्रकसोबत तत्पर आहे. विशेष म्हणजे, ग्रॅनाईटच्या विशाल एकाच दगडात शिवलिंग तयार करण्यात आले आहे. हे शिवलिंग तयार करण्याला तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.