कच्छ,
11 Pakistani fishermen arrested कच्छमधील जखौ समुद्र क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल ११ पाकिस्तानी मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. त्यांना तटरक्षक दलाने पकडून किनाऱ्यावर आणले आहे. स्थानिक पोलिसांकडून त्यांच्याविरुद्ध तपास सुरू असून, त्यांच्या कृतीबाबत कठोर चौकशी केली जाणार आहे. अद्याप कोणताही संशयास्पद पदार्थ त्यांच्या जवळ आढळलेला नाही.
यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कच्छ जिल्ह्यातील कोरी खाडी परिसरात सीमा सुरक्षा दलाने १५ पाकिस्तानी मच्छिमारांना अटक केली होती. त्या वेळी त्यांनी इंजिन असलेली देशी बनावटीची बोट जप्त केली होती. शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात मासे, मासेमारीची जाळी, डिझेल, बर्फ आणि अन्नपदार्थही ताब्यात घेतले गेले होते.