वर्धा,
international-conference : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सावंगी (मेघे) येथील अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या वतीने आरोग्य, शिक्षण व उद्योग क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
आधुनिक जगात कृत्रिम बुद्धिमत्ता ही सर्वाधिक रुपांतरित करणारी शती ठरली. असून ती समाजव्यवस्था, विविध उद्योग, मानवी कामकाज, संवाद आणि ज्ञानसमज यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम घडवित आहे. अभियांत्रिकी किंवा संगणकशास्त्राच्या पलीकडे जाऊन आरोग्य, कृषी, शिक्षण, प्रशासन, पर्यावरणीय निरीक्षण, उत्पादन, सार्वजनिक सेवा आणि कला या सर्व क्षेत्रांत आपली उपस्थिती सिद्ध करत आहे. तंत्रज्ञानाची भाकित करण्याची, विश्लेषण करण्याची आणि क्रिया पार पाडण्याची क्षमता वाढत असताना, जगभरातील संस्थांसमोर त्याचे जबाबदार आकलन आणि पुढील पिढीला याबद्दल चिंतनशील व सर्जनशील बनविण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, इटली, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, चीन, नायजेरिया, केनिया आणि थायलंड अशा विविध देशांतील प्रतिनिधी तसेच भारतातील संशोधकांनी या परिषदेत सहभाग घेतला होता. येथे संशोधकांकडून १ हजार ३१९ संशोधनपत्रे प्राप्त झाली. पुनरावलोकनातून ३५८ संशोधनपत्रे स्वीकारली गेली आणि त्यापैकी २७८ सादरीकरणासाठी निवडली गेली.
प्रथम सत्रात डॉ. आर. एस. शिंदे यांनी भारतातील सुपरकंडटिंग मॅगलेव्ह तंत्रज्ञानावरील केलेल्या संशोधनाचा आढावा घेतला. उद्घाटन समारंभानंतर दोन दिवसांन ३४ सत्रे आयोजित करण्यात आली. त्यापैकी १३ सत्रे प्रत्यक्ष तर २१ सत्रं ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.