बल्गेरियन,
Baba Vanga 2026 prediction बल्गेरियन नेत्रहीन महिला आणि प्रसिद्ध भविष्यद्रष्टा बाबा वेंगा उर्फ वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा यांनी २०२६ साठी केलेली भविष्यवाणी सध्या जागतिक चर्चेचा विषय बनली आहे.त्यांच्या भाकितांमध्ये कोरोना महामारी, ९/११ हल्ला, राजकुमारी डायना यांचा मृत्यू, चेर्नोबिल अणू दुर्घटना आणि इतर अनेक महत्त्वाच्या घटनांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या २०२६ साठीच्या भाकिताकडे जगभरातील नागरिक, शास्त्रज्ञ आणि मीडिया विशेष लक्ष देत आहेत.
बाबा वेंगाच्या Baba Vanga 2026 prediction अंदाजानुसार, २०२६ मध्ये संकटांची सुरूवात मार्च महिन्यात होईल. त्यांनी सांगितले की, रशिया आणि चीनसारख्या देशांमधून सुरू होणारा संघर्ष अमेरिका आणि युरोपसह जगातील इतर खंडांवरही परिणाम करेल. हा संघर्ष तिसऱ्या महायुद्धासारखा भयंकर स्वरूप धारण करू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.त्यांनी आणखी सांगितले की, एप्रिलपासून जूनपर्यंत पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आपत्ती घडू शकतात. या काळात भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि तीव्र हवामानाच्या घटनांमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचा सुमारे ७-८ टक्के भाग उद्ध्वस्त होऊ शकतो. यामुळे केवळ मानवहानीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्यही गंभीर धोक्यात येऊ शकते.बाबा वेंगाच्या अवकाशाशी संबंधित भाकितानुसार, नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये पृथ्वीच्या वातावरणात एक रहस्यमय अवकाश वस्तू प्रवेश करू शकते. तज्ज्ञांनी यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे, कारण यामुळे पृथ्वीवरील जीवनावर प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांचे असेही भाकित आहे की, २०२६ हे वर्ष तंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. यंत्रे आणि प्रगत तंत्रज्ञान मानवी जीवनावर आधीपेक्षा अधिक परिणाम करणार असल्याचे बाबा वेंगाने सूचित केले आहे.
बाबा वेंगाच्या Baba Vanga 2026 prediction भाकितांनी पुन्हा एकदा जगभरातील नागरिकांना सजग राहण्याची आणि भविष्यासाठी तयारी करण्याची गरज अधोरेखित केली आहे. जरी त्या आज आपल्यासोबत नसल्या, तरी त्यांच्या अंदाजांमुळे २०२६ या वर्षाकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.