बुलढाणा,
water-resources-issues : आ. संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात बुलढाणा तसेच मोताळा तालुयातील बहुउपयोगी व अत्यंत महत्त्वाच्या जलसंपदा विषयांवर तातडीची उच्चस्तरीय बैठक दि. ११ डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत विविध प्रलंबित कामांच्या मंजुरीसंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. बुलढाणा व मोताळा तालुयाच्या सिंचन व्यवस्थेतील अडचणी सोडवण्यासाठी तसेच भविष्यातील शेती विकासाला गती देण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.

मोताळा तालुयातील व्याघ्रा ल.पा. प्रकल्पाची गेल्या ३३ वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धरण भिंतींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तसेच कालव्यामधून होणार्या मोठ्या पाण्याच्या गळतीमुळे शेतकर्यांना सिंचनाचे पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. या प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीकरिता ३५ कोटी रुपये मंजूर करण्यासंदर्भात आ. गायकवाड यांनी ठोस मागणी केली. या संदर्भात मंत्री महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. मोताळा तालुयातील राहेरा संग्राहक लघु.पाट प्रकल्पांतर्गत शासकीय उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्याबाबत आणि इतर प्रलंबित कामांना त्वरित मंजुरी देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पांमुळे परिसरातील पाणीसाठा क्षमता वाढून हजारो एकर शेतीला दिलासा मिळणार आहे. मोताळा तालुयातील विश्वगंगा नदीवरील पलढग धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी मोठा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला. याअंतर्गत ‡ ४०% पाणी नळगंगा धरणात,६०% पाणी धामणगाव देशमुख तलावात वळविण्याच्या संदर्भात सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत गंभीर चर्चा झाली. या प्रस्तावाला मंत्री महाजन यांनी सकारात्मक संकेत देत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला जलसंपदा मंत्री विभागातील वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक तज्ज्ञ आणि संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.