धनादेश अनादर प्रकरणी कर्जदारास ३ महिने कारावास

७० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वाशीम,
cheque bounce case Washim, स्थानिक समृध्दी नागरी व ग्रामीण सह. संस्थेकडुन १ लाख रुपयाचे कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड केली नाही. तसेच कर्ज भरणा करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरीत झाला. त्यामुळे धनादेश अनादरीत प्रकरणी कर्जदार गणेश बबन इढोळे रा. वाळकी जहागिर यास येथील प्रथम न्यायदंडाधिकारी अंजली फकाबादकर यांनी ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा व ७० हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
 

cheque bounce case Washim, 
तालुयातील वाळकी जहागिर येथील गणेश इढोळे याने येथील समृध्दी नागरी व ग्रामीण पत संस्थेकडुन १ लाख रूपये कर्ज घेतले होते. अनेक महिने कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने कर्ज रकमेचा हप्ता भरण्याची विनंती कर्जदार गणेश बबन इढोळे यांना केली. मात्र, गणेश इढोळे यांनी कर्ज भरण्यासाठी ५४ हजार रुपयाचा धनादेश संस्थेला दिला. हा धनादेश पत संस्थेने वटवण्याकरिता लावला असता तो अनादरीत झाला. धनादेश अनादरीत झाल्याने संस्थेने हे प्रकरण वाशीम येथील न्यायालयात कलम १३८ नुसार पत संस्थेचे मुख्य व्यवस्थापक डी. आर. होले यांनी न्यायालयात दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अंजली फकाबादकर यांच्या न्यायालयात झाली. विद्यमान न्यायालयाने फिर्यादी व अरोपी पक्षाची बाजु ऐकुण घेतल्यानंतर गुन्हा सिध्द झाल्याने कर्जदार गणेश इढोळे यांस ३ महिने सक्त मजुरी व ७० हजार रू नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. या धनादेश अनादर प्रकरणात समृध्दी नागरी व ग्रामीण पत संस्थेतर्फे अ‍ॅड. बि.आर. कंगले यांनी बाजु मांडली. या निकालामुळे धनादेश अनादरीत करणार्‍याचे चांगलेच धाबे दणानले आहे.