परवानगीशिवाय सलमानचा फोटो–व्हिडिओ वापरा येणार नाही!

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Do not use Salman's photos or videos डिजिटल जगतात वाढत्या गैरवापराच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानने त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण मिळावे म्हणून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ११ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या समोर सुनावणी झाली. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्याचे फोटो, नाव, आवाज, शैली आणि ओळखीचे इतर घटक परवानगीशिवाय वापरले जात असल्याचा दावा अभिनेता आणि त्याच्या कायदेशीर टीमने केला आहे.
 
 

salman khan 
सलमान खानच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, काही ई-मार्केटप्लेस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे नाव वापरून एआय चॅटबॉट्स, दिशाभूल करणारी सामग्री आणि त्याच्या ओळखीची नक्कल करणारी अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत. त्यांनी अॅपलने अशाच प्रकारच्या एका अॅपला डाउनलोडसाठी परवानगी दिल्याचाही उल्लेख केला. या सर्व अनधिकृत वापरामुळे चाहत्यांची दिशाभूल होऊ शकते तसेच अभिनेत्याच्या ब्रँड व्हॅल्यू आणि आर्थिक हिताला धक्का बसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
यावर न्यायालयाने सोशल मीडिया मध्यस्थांना ही याचिका औपचारिक तक्रार म्हणून हाताळण्याचे निर्देश दिले आहेत आणि नियमांनुसार तीन दिवसांत कारवाई करावी असे आदेश दिले. तसेच गैर-सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर खानच्या ओळखीचा परवानगीशिवाय वापर रोखण्यासाठी न्यायालय लवकरच स्थगिती आदेश जारी करणार असल्याचेही स्पष्ट केले.