नागपूर,
Dr. Ambedkar College डॉ. आंबेडकर कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी सेंट्रल इंडिया ज्युनिअर कॉलेज, लोनारा येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळवले.इयत्ता ११ वी कला शाखेतील दिपाली राठोड हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर इयत्ता १२ वी कला शाखेतील लकी पिंपळकर यांनी प्रोत्साहन पारितोषिक मिळवले.

पुरस्कार वितरण ८ डिसेंबरला अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी कॅबिनेट मंत्री अनिस अहमद, कौटुंबिक कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर, आमदार चंद्रदीप नारके आणि गरुड झेपचे संस्थापक एस. एस. सोनवणे उपस्थित होते. Dr. Ambedkar College या यशाबद्दल परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, समितीचे सदस्य, प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, उपप्राचार्या हर्षा बोरकर, तसेच विभाग प्रमुख प्रा. कुणाल पाटील, प्रा. विकास सिडाम आणि इतर सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या मार्गदर्शक प्रा. विकास सिडाम, प्रा. सतीश कर्पे आणि प्रा. ज्योईता रॉय यांचे मनःपूर्वक आभार मानले.विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सौजन्य:प्रफुल ब्राम्हणे,संपर्क मित्र