इंडिगो प्रवाशांना देणार १० हजार रुपयांचे व्हाउचर!

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Indigo will provide vouchers इंडिगोने प्रवाशांसाठी मोठी घोषणा केली आहे. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान गंभीर अडचणींना सामोरे गेलेल्या प्रवाशांना ₹१०,००० किमतीचे प्रवास व्हाउचर दिले जाणार आहे. कंपनीने सांगितले की, ही भरपाई सरकारी मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा वेगळी आहे आणि व्हाउचर पुढील १२ महिन्यांत कोणत्याही इंडिगोच्या प्रवासासाठी वापरता येऊ शकतात. इंडिगोच्या काही उड्डाणांमध्ये तांत्रिक अडचणी, हिवाळ्यातील हवामानाचा परिणाम, क्रू ड्युटी नियमातील बदल आणि विमानतळावरील गर्दीमुळे व्यत्यय आला होता.
 
 
indigo flights
 
यामुळे बुधवारी दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबई विमानतळांवर २२० हून अधिक उड्डाणे रद्द झाली, त्यात दिल्लीत १३७ रद्द होत्या. बेंगळुरूमध्ये ६० उड्डाणे रद्द करण्यात आल्या. एअरलाइनचे सीईओ पीटर एल्बर्स डीजीसीएसमोर अहवाल सादर करतील. इंडिगो दररोज २,२०० हून अधिक उड्डाणे चालवते, जी हिवाळ्यातील वेळापत्रकात १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहेत. इंडिगोच्या अध्यक्ष विक्रम मेहताने या संकटाबद्दल माफी मागितली असून सांगितले की, व्यत्ययामागे तांत्रिक बिघाड, हवामान, वेळापत्रक बदल, वाढलेली गर्दी आणि सुधारित क्रू नियमांचा समावेश आहे.