वर्धा,
general-knowledge-exam : स्थानिक प्राचीन श्रीराम मंदिर व श्रीराम शोभा यात्रा समितीया वतीने वर्धतील शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व उद्बोधक विषय घेऊन सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदा ही सामान्य ज्ञान स्पर्धा न्यू इंग्लिश हायस्कूल येथे रविवार १४ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत आयोजित करण्यात आली असल्याचे या उपक्रमाचे निर्माते संजीव लाभे यांनी कळवले आहे.
दरवर्षी वर्धेसह देशातील विविध विषयांना घेऊन या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्राचीन व अर्चाचीन भारतीय वैज्ञानिकांची व त्यांच्या उपयुत संशोनाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ६७ निवडक संशोधकांची माहिती देणारी पुस्तिका तयार करण्यात आली. ती पुस्तिका इच्छुक विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली आहे. या पुस्तिकेवर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा होईल. या परीक्षेत पाच ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा अ गट व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा ब गट तयार करण्यात आला आहे. वर्धा व परिसरातील ३१ शाळांमधील ३ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेकरिता नोंदणी केली आहे. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाणार असून तीस विद्यार्थ्यांना रोख बक्षीस दिले जाणार आहे. पुस्तिकेचे प्रायोजक अरुण लेले व श्रीनिवास बजाज हे असुन ८८ खोल्यांमध्ये परीक्षार्थींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यशस्वीतेकरिता श्रीराम मंदिर व श्रीराम शोभायात्रा समितीचे शेकडो कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या १५ मिनिटं आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.