आरमोरी,
leopard captured Maharashtra बर्याच दिवसांपासून देऊळगाव-इंजेवारी परिसरात धुमाकुळ घालणार्या बिबट्याला वनविभागाने ‘ऑपरेशन लेपर्ड’ मोहिम राबवून अखेर मध्यरात्रीच्या सुमारास जरबंद केले.आरमोरी तालुक्यातील देऊळगाव-इंजेवारी परिसरात सदर बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवून दोन महिलांचा बळी घेतला होता.

दरम्यान वनविभागाने ‘ऑरशेन लेपर्ड’ यशस्वीपणे राबवून मध्यरात्रीच्या सुमारास जेरबंद केले. ‘ऑपरेशन लेपर्ड’ ययस्वी ठरल्याने भीतीच्या साटाखाली असणार्या परिसरातील नागरिकांची एकदाचा सुटकेचा श्वास घेतला आहे. देऊळगाव-इंजेवारी परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरु असल्याने शेतात जाणे, रात्री बाहेर पडणेही ठिीण झाले होते. त्या दरम्यान सलग झालेल्या दोन प्राणघातक हल्ल्यामुळे संतप्त नगरिकांनी काही दिवसापूर्वी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन छेडले होते. या पृष्ठभूमीवर वनविभागाने तातडीने शोधमोहिम राबवित देऊळगाव-इंजेवारी परिसरात पाळत वाढविली. जलद प्रतिसाद पथक आणि स्थानिक वनकर्मचार्यांनी संयुक्त समन्वय साधत जंगल परिसरात विविध ठिकाणी सापळे उभारले. दरम्यान, आज 11 डिसेंबर रोजी मध्यरात्री बिबट्याला पिंजर्यात जेरबंद करण्यास यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर झाले असून सर्वत्र वनविभागाचे कौतूक होत आहे.