२५ जणांचा बळी घेणाऱ्या लुथ्रा बंधूना थायलंडमध्ये अटक!

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
बँकॉक,
Luthra brothers arrested in Thailand गोव्यातील बिर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला, आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी लुथ्रा बंधू भारतातून पळून थायलंडमध्ये गेले होते. त्यांचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले. भारत सरकारने लुथ्रा बंधूंविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आणि त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, आगीच्या प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जाईल आणि आरोप निश्चित झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल.
 
 
Luthra brothers arrested in Thailand
६ डिसेंबरच्या रात्री या नाईट क्लबमध्ये अचानक आग लागली होती. आतापर्यंत क्लबच्या चार मालकांपैकी दिल्लीचा रहिवासी अजय गुप्ता याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची दिल्ली गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी झाली आणि नंतर साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अजय गुप्ता यांना ३६ तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान अजय गुप्ता यांनी सांगितले की, मी फक्त एक व्यवसाय भागीदार आहे आणि मला त्यापेक्षा जास्त काही माहिती नाही. क्लबचे दोन मालक, सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा, आग लागल्यानंतर लगेच दिल्लीहून थायलंडला पळून गेले. इंटरपोलने दोघांविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे आणि भारत सरकारने त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. तसेच, गोव्यातील आणखी एक नाईटक्लब मालक सुरिंदर कुमार खोसला, जो ब्रिटिश नागरिक आहे, त्याच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे.