नागपूर,
nagpur-cold-weather : उत्तर भारतात थंडीच्या लाटेने बहुतांश राज्यांत तापमानात कमालीची घट झाली असून, विदर्भासह नागपूर शहर अक्षरशः गोठले आहे. या लाटेच्या परिणामी गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी, सिव्हील लाइन्स, फुटाळा, भरतनगर, रवीनगर, रामनगर, गोकुळपेठ, धरमपेठ आदी भागात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. थंड लाटेचा परिणाम दिसू ठिकठिकाणी शेकोटया पेटलेल्या दिसून येत आहे.
सकाळी व सायंकाळच्या सुमारास तेलंगखेडी, गोरेवाडा भागात धुके जाणवत असून, सरासरी तापमान घटण्याची शक्यता आहे. नागपूरचा रात्रीचा पारा १० अंशांच्या खाली जात असून गुरुवारी ८.१ अंशांची नोंद झाली. विदर्भात गोंदियानंतर नागपूर सर्वांत थंड शहर ठरले आहे. पुढचे ४८ तास हा गारठा कायम राहणार हिवाळी अधिवेशन सुरू होताच थंडीचा तडाखा सुरु झाल्याने हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या राजकीय नेत्यांना थंडीचा फटका बसला आहे.
बुधवारी किमान तापमान ८.० अंशांवर गेले होते. त्यानंतर तापमानात वाढ झाली. डिसेंबर महिन्याचे पहिले दोन दिवस गारठा कमी राहिल्यानंतर ३ तारखेपासून पुन्हा तापमान घसरत गेले. रात्रीसह दिवसाचे तापमानसुद्धा खाली घसरले आहे. गुरुवारी अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.