Planetary alignment in 2026 २०२५चा शेवटचा महिना सुरू होताच नवीन वर्ष २०२६ची चाहूल लागली आहे. कॅलेंडर बदलताना ग्रहांची स्थितीदेखील बदलणार असून यावेळी नवीन वर्षाचा अधिपती गुरू असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूच्या अधिपत्यामुळे आणि शनी–सूर्याच्या अनुकूलतेमुळे काही राशींवर विशेष कृपादृष्टी राहणार आहे. द्रिक पंचांगानुसार, २०२६मध्ये शनी कोणतेही संक्रमण करणार नसल्याने मीन राशीत गुरूचा प्रभाव सतत राहील. गुरूच अधिपती असल्याने त्याच्याशी मैत्री असलेल्या सूर्याचादेखील सामर्थ्य वाढेल. गुरू, सूर्य आणि शनी यांच्या या अनुकूल संयोगामुळे पाच राशींना करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीत उल्लेखनीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- मेष राशीसाठी २०२६ नवे संधी आणणारे वर्ष ठरेल. करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होण्याची चिन्हे असून व्यवसायातही अचानक वाढ जाणवेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आणि परदेशातील संधींची दारेही उघडू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल आणि वर्षभर आरोग्यही चांगले राहील.
- वृषभ राशीच्या जातकांना मोठे व्यावसायिक करार मिळण्याची आणि नफा वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढेल, तर कौटुंबिक आयुष्यही सुखकर राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि गुरू–शनीच्या प्रभावाने अनपेक्षित लाभ संभवतील.
- कर्क राशीच्या व्यक्तींना नव्या व्यावसायिक संधी मिळतील. वरिष्ठांचा पाठिंबा मजबूत राहील आणि पदोन्नतीकडेही वाटचाल होईल. परदेश प्रवासाचा योग तयार होईल. कुटुंबातील सौहार्द वाढेल, आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि मानसिक शांतता लाभेल.
- कन्या राशीवाल्यांसाठी २०२६ करिअरमध्ये स्थैर्य आणणारे ठरेल. दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात नफा वाढेल, मोठ्या करार मिळतील आणि भागीदारीतही यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील आणि आरोग्यही संतुलित राहील.
- धनु राशीसाठी हे वर्ष प्रगतीचे ठरेल. नोकरीत उच्च पद मिळण्याचे आणि व्यवसायात वाढ साधण्याचे संकेत आहेत. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल, तर गुरू आणि सूर्याच्या प्रभावामुळे सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कठोर परिश्रमाचे योग्य फल मिळाल्याने आत्मविश्वासही द्विगुणित होईल.