नागपूर,
Prime Minister Matru Vandana Yojana, प्रधानमंत्री मातृवंदन योजना दुसèया खात्यात वळती करण्याचा निर्णय शासनाने घेतला खरी. मात्र, या निर्णयामुळे सलग वीस वर्षे प्रामाणिक काम करणाèया कंत्राटी कर्मचाèयांची ‘ना घरका ना घाट का’ अशी अवस्था झाली आहे. तातडीने समायोजित करण्याच्या मागणीसाठी या कर्मचाèयांचा संघर्ष सुरू आहे.
रज्जू टिकाराम परिपगार या कंत्राटी कर्मचारीने तर ऐच्छिक मरणाची परवानगी मागत अवयवदान देण्याची तयारी दर्शवली आहे. वातानुकूलित कक्षात बसणाèया अधिकाèयांच्या एका अविचारी निर्णयाने राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदन योजनेतील हे सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय एका झटक्यात रस्त्यावर आले आहेत.
रज्जू परिपगार यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात आज ठिय्या देत अन्नत्याग केला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर या कार्यालयात आरोग्य खात्याच्या उच्चस्तरीय अधिकाèयांच्या बैठकीसाठी आले. त्यांनी रज्जू परिपगार, निलेश आढुळकर व इतर कंत्राटी कर्मचाèयांचे म्हणणे जाणून घेतले.
प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत 2006 पासून राज्यातील 48 (त्यात विदर्भातील 22) कंत्राटी कर्मचारी सलग सेवा देत होते. काही महिन्यांपूर्वी अचानकच ही योजना आरोग्य खात्याकडून महिला व बालविकास खात्याकडे देण्यात आली. यामुळे हे सर्व 48 कर्मचारी रस्त्यावर आले. सहा महिन्यांपासून त्यांना वेतन किंवा मानधनही नाही.
या कर्मचाèयांसाठी Prime Minister Matru Vandana Yojana, महिला व बालविकास खात्यानेही दारे बंद केली. उलट बाह्यस्त्रोत भरती करून जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रीय आरोग्य अभियानात रिक्तपदी समायोजित करून सेवा ज्येष्ठतेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी या कर्मचाèयांनी केली. याबाबत मंत्र्यांनी बैठक घेतली. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेतील या कर्मचाèयांना राष्ट्रीय आरोग्य योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या सहसंचालकांनी शासनास सादर करावा, असा निर्णय या बैठकीत झाला. मात्र, अद्याप काहीही हालचाल झालेली नाही.
या कर्मचाèयांचे ऐकून घेतल्यानंतर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर बैठकीत गेले. दरम्यान, प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू यांनीसुद्धा या कर्मचाèयांचे म्हणणे ऐकूून घेतले. मंत्र्यांची भेट घेऊन आल्यानंतर ‘हा प्रश्न दोन खात्यांमधील असल्याने मुंबईत दोन्ही मंत्री व अधिकाèयांची बैठक घेऊ’ असे कर्मचाèयांना सांगितलेे.