आर्वी नपच्या शाळांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची भेट

*समूह शाळेच्या संकल्पनेनुसार दिल्या मार्गदर्शक सूचना

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
आर्वी, 
municipal council schools येथील नगर परिषदेच्या पीएमश्री गांधी विद्यालय आणि शिवाजी शाळेला ९ रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांनी भेट देत समूह शाळेच्या प्रकल्पाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने समूह शाळा प्रकल्प राबविण्याचे ठरविले असून प्रायोगिक तत्त्वावर आर्वी नगर परिषदेच्या गांधी विद्यालयाची निवड केली आहे. त्या संबंधात प्राथमिक माहिती गोळा करणे व सर्व संबंधितांशी चर्चा करून त्यांना आवश्यक ते निर्देश देणे यासाठी या भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
 
 
 
munciplae carporation
 
यावेळी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, प्राचार्य व्हि. टी. पायले, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. जयश्री घारफळकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये, समग्र शिक्षा एमपीएसपी मुंबईचे उपअभियंता बोराडे, पंसचे गटशिक्षणाधिकारी पंकज तायडे, कार्यक्रम अधिकारी सिद्धेश वाडेकर यांची उपस्थिती होती. गांधी विद्यालय ही खूप जुनी शाळा असून शाळेमध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळेविषयी प्राचार्य पायले आणि नप मुख्याधिकारी डॉ. सुकलवाड यांनी माहिती दिली. यावेळी रणजितसिंग देओल यांनी शालेय परिसराची पाहणी केली. सोबतच दहावीतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी गांधी विद्यालयातील सर्वात जुने असलेले एनसीसी युनिटच्या कार्यालयाला सुद्धा भेट देत उपक्रमाबाबत एनसीसी अधिकारी प्रमोद नागरे यांच्याकडून माहिती घेतली.municipal council schools प्रधान सचिव देओल आणि इतर अधिकार्‍यांच्या संकल्पनेनुसार पहिली ते बारावीसाठी एक समूह शाळा असावी, ज्या शाळा ३ किमीच्या परिघात आहे आणि त्यांची पटसंख्या कमी आहे त्या सर्व शाळांचे एकत्रिकरण या समूह शाळेत करणे हा या भेटीचा उद्देश होता. भविष्यामध्ये समूह शाळेची सुरूवात ही आर्वीतील पीएमश्री नगरपरिषद शाळेतून होईल, यासाठी आज हे सर्व अधिकारी एकत्र आले होते. यावेळी देओल यांनी अधिकार्‍यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या.