कोर्टात राज ठाकरे म्हणाले, गुन्हा कबुल नाही!

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Raj Thackeray in court महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणी ठाणे रेल्वे न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले. कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण आणि स्टेशनचे नुकसान झाल्याच्या आरोपांमध्ये राज ठाकरेसह ८ जणांवर खटला होता. मनसेने या आंदोलनामागे मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप केला होता. २०१९ पर्यंत हा खटला कल्याण रेल्वे कोर्टात चालत राहिला, पण राज ठाकरे कोर्टात उपस्थित झाले नव्हते. आजच्या सुनावणीदरम्यान ते स्वत: हजर होते. न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी विचारले की, “तुम्हाला गुन्हा कबुल आहे का?” यावर राज ठाकरे म्हणाले, मला गुन्हा कबुल नाही.
 
 
Raj Thackeray in court
 
कोर्टाने राज ठाकरे यांना प्रकरण सोयीस्करपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले, एक महिन्यात प्रकरण पूर्ण होईल, तुम्हाला वारंवार हजर राहावे लागणार नाही असे सांगितले. या सुनावणीत राज ठाकरेसह मनसेचे नेते नितीन देसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि नितीन सरदेसाईही उपस्थित होते. ठाणे कोर्टात राज ठाकरे यांच्या बाजूने ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी युक्तिवाद मांडला.