मुंडले स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस साजरा

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नागपूर,
R.S. Mundale English School आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा दिवस नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पद्माकर चारमोडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश दिला.
 
 
lambe
 
कार्यक्रमास धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड . उल्हास औरंगाबादकर, मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी, कार्यक्रम प्रमुख सोनाली भागवत यांसह शिक्षक, पालक व मान्यवर उपस्थित होते.एप्पल, आर्यभट्ट, भास्कर व रोहिणी या गटांमध्ये १००, २००, ४०० मीटर धावणे, गोळाफेक, लांबउडी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. R.S. Mundale English School विजेत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सूत्रसंचालन सोनाली कठाळे व प्रियांका गुप्ते यांनी केले. आयोजनात पंकज करपे व सौरभ दुबे यांचे विशेष योगदान लाभले.
सौजन्य: प्रीती लांबे,संपर्क मित्र