राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन संगोष्टी कार्यक्रम साजरा

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
गडचिरोली,
RSS Jansangoshthi program Gadchiroli, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गडचिरोलीतर्फे 7 डिसेंबरला डीएसआर सभागृहात प्रमुख जन संगोष्टी हा कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाज जिवनाच्या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीचे चर्चा, संवाद घडावा या दृष्टीने ‘प्रमुख जन संगोष्टी’ चे आयोजन करण्यात आले होते.
 

RSS Jansangoshthi program Gadchiroli, 
यावेळी मंचावर संघाचे जिल्हा संघचालक (रा. स्व. संघ गडचिरोली) घिसुलाल काबरा होते. प्रमुख वक्ते म्हणुन अखिल भारतीय युवा आयाम प्रमुख, वनवासी कल्याण आश्रम नागपूरचे वैभव सुरंगे हे होते. कार्यक्रमाची सुरूवात ‘वंदे मातरम’ या गिताने झाली व सांगता राष्ट्रीय गिताने झाली.यावेळी आपल्या मार्गदर्शनात वैभव सुरंगे यांनी सांगितले की, आपला धर्म आणि संस्कृती हे राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे. तसेच देश वाचवायचा असेल तर पर्यावरण वाचवणे आवश्यक आहे. समाजात समरसता होणे आवश्यक आहे, असे सांगितले. यावेळी कार्यक्रमामध्ये संघ साहित्याची विक्री करण्यात आली. जिल्हा प्रचार प्रमुख प्रा. राकेश इनकणे, सागर साबडे यांनी प्रदर्शनी व साहित्य विक्री केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष बोलुवार, सौरभ पूण्यप्रेड्डीवार, चक्रधर उरकुडे तसेच अनेक स्वयंसेवकांनी हातभार लावला. कार्यक्रमाचे संचालन यांनी तर आभार कुणाल कोवे यांनी केले.